महाराष्ट्राची कोल्हापुरी चप्पल जगभरात आपली ओळख निर्माण करून बसली आहे.(Prada) पण काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरीवर आधारित चप्पलसदृश प्रोडक्ट बाजारात आणलं, तेव्हा महाराष्ट्राचं किंवा कोल्हापूरचं नावच न घेता हा डिझाईन जगासमोर ठेवला. सोशल मीडियावर कलाकार, नेते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला, #Kolhapuri ट्रेंड झाला आणि अखेर प्राडालाच मागे हटावं लागलं. आता त्याच ब्रँडने अधिकृतरीत्या कोल्हापुरी पायताणापासून प्रेरणा घेत, भारतीय कारागिरांसोबत मिळून एक खास उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.प्राडानं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुशल कारागिरांसोबत काम करण्यासाठी दोन सरकारी संस्थांशी—लिडकॉम आणि लिडकार—विशेष करार केला आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी इटलीतील महावाणिज्य दूतावासात या MoU वर सही झाली. प्राडाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी लोरेन्झो बर्टेली यांनी या सहकार्यातील संपूर्ण माहिती जाहीर केली.

प्राडा आणि भारतीय संस्थांमधील या भागीदारीनंतर बाजारात येणाऱ्या (Prada) नवीन “प्राडा कोल्हापुरी”ची किंमतही तितकीच चर्चेचा विषय ठरतेय. एका जोडाची आंतरराष्ट्रीय किंमत 930 युरो म्हणजेच सुमारे 84,000 रुपये. म्हणजेच एक चप्पल तब्बल 42,000 रुपयांची! पण ही किंमत ‘लिमिटेड एडिशन’ असल्यामुळे आणि प्राडाच्या हाय-फॅशन दर्जामुळे ठरवण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.काही महिन्यांपूर्वी प्राडाचे तज्ज्ञ कोल्हापूरमध्ये येऊन पारंपरिक कोल्हापुरी तयार करण्याची प्रक्रिया, कारागिरांची कौशल्यकला आणि चामडीवरची नक्षी याचा अभ्यास करून गेले होते. कारागिर सहकारी संस्थांच्या प्रमुखांसोबतही त्यांनी चर्चा केली. या सर्व अभ्यासाच्या आधारे आता प्राडा परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधणारे एक विशेष उत्पादन जगभरात उतरवणार आहे.या करारानुसार पुढील टप्प्यात स्थानिक कारागिरांना प्राधान्य दिले जाईल आणि सुरुवातीला जवळपास 2,000 जोड चपला तयार करण्यात येतील. लिडकॉम आणि लिडकार या दोन्ही संस्थांची औपचारिक देखरेख आणि मार्गदर्शन या प्रक्रियेत असणार आहे. प्राडाच्या आधुनिक डिझाईन बरोबरच भारतीय हस्तकलेची झळाळी दिसेल असा हा संपूर्ण उपक्रम डिझाइन करण्यात आला आहे.

, शतकांपासून जपली गेलेली चप्पलनिर्मितीची परंपरा आणि प्राडाची(Prada) समकालीन डिझाईन सौंदर्यशैली यांच्या मिलाफातून खास कोल्हापुरी तयार केली जात आहे. यामध्ये भारतीय परंपरेची मराठमोळी ओळख आणि प्राडाचे हाय-फॅशन टच दोन्ही पाहायला मिळतील.ही खास एडिशन फेब्रुवारी 2026 पासून प्राडाच्या जगभरातील 40 स्टोअर्समध्ये आणि प्राडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राच्या या पारंपरिक कलागुणाला आंतरराष्ट्रीय फॅशन मंचावर मिळणारा हा नवा सन्मान अनेकांसाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit