2025 चा डिसेंबर महिना संपत आला असताना विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे.(Holiday) उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात 27 डिसेंबरला श्री गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या सुट्टी यादीत बदल झाल्यानंतर ही तारीख अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे.सुट्टीनिमित्त जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये, तहसील, ब्लॉक कार्यालये, सर्व शाळा-महाविद्यालये—सरकारी आणि खासगी—तसेच यूपी बोर्डाच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. बँकाही बंद राहण्याची शक्यता आहे. शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने नागरिकांना सलग दोन दिवसांचा आराम मिळणार आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशातील सर्व शाळांना 20 ते 31 डिसेंबरपर्यंत हिवाळी सुट्टी लागू (Holiday)असून विद्यार्थ्यांना तब्बल 12 दिवसांचा ब्रेक मिळेल. पीएमश्री शाळांमध्ये 23 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सुट्टी राहणार आहे.राजस्थानमध्येही 25 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि इतर उत्तरेकडील राज्यांतही तापमान कमी (Holiday)झाल्यावर सुट्ट्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.24 डिसेंबरला ख्रिसमस ईव्ह आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसमुळे देशभरातील बहुतांश शाळा बंद राहतील. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुलांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit