डिजिटल अरेस्ट पद्धतीचा वापर करून इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या(reported) सेवानिवृत्त वृद्ध लिपिकाला लक्ष्य करत तब्बल ५४ लाख ८५ हजार ६२४ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास आता कोल्हापूर सायबर गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला असून तपासाची जबाबदारी हस्तांतरित केल्याची माहिती तपासाधिकारी पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली आहे. शहरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली घडलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त लिपिक पाटील यांच्या (reported)भीतीचा गैरफायदा घेत सलग १३ दिवस त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. या काळात त्यांना विविध बँका आणि पतसंस्थांमधील सर्व मुदत ठेवी मोडायला लावून जमा झालेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमार्फत आरटीजीएसद्वारे संशयितांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. धमकी आणि अटक होण्याच्या भीतीने पाटील आठवडाभर कुटुंबीयांपासून दूर राहत एकाकी अवस्थेत होते.

दरम्यान, खोलीत स्वतःला कोंडून घेऊन ते तासन्तास संशयितांशी (reported)व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर बोलत राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सातत्याने निर्माण करण्यात आलेल्या भीतीमुळे सायबर गुन्हेगारांनी मानसिकदृष्ट्या त्यांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सायबर शाखेकडून सुरू आहे.
हेही वाचा :
दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका
पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र
अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा