कबनूर येथे रुई फाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय(farmhouse) चालविला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एकूण एक लाख दोन हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एजंट पंकज विठ्ठल चव्हाण बालाजीनगर, शहापूर चौक, इचलकरंजी, लॉजचालक संतोष सुरेश पाटील रा. षटकोन चौक, इचलकरंजी, लॉज मॅनेजर नेमिनाथ दादा आवटे कबनूर व लॉजचा मूळ मालक अमित आण्णासाहेब देमण्णा माणगाव यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

न्यायालयाने संशयितांनी १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.(farmhouse) दोन पीडित महिलांची जिल्हा शासकीय वसतिगृहात रवानगी केल्याची माहिती तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ता. १३ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षाला प्राप्त माहितीनुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, कोल्हापूर यांच्या पथकाने या फार्म हाऊसवर छापा टाकला.

कारवाईत एजंट पंकज चव्हाण, लॉजचालक संतोष पाटील, (farmhouse) लॉज मॅनेजर नेमिनाथ आवटे आणि लॉजचा मूळ मालक अमित देमण्णा यांचा सहभाग उघड झाला. संशयितांनी आर्थिक आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवले होते.याप्रकरणी अश्विन डुणुंग यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन पीडित महिलांची सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा (farmhouse) शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीर्घकाळ व्यवसायाचा संशयकारवाईत लॉजमध्ये ठेवलेले रजिस्टर मिळून आले. याची पाहणी केली असता पाच नोव्हेंबर २०२५ पासून गिऱ्हाईकांच्या नोंदी दर्शविण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा व्यवसाय दीर्घकाळ सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *