सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(offering)एलआयसी ही एक सरकारी कंपनी आहे. कंपनीने आयटी प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे.एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ही भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदावर नियुक्ती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी www.lichousing.com वर जाऊन अर्ज करायचे आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स ही देशातील प्रमुख हाउसिंग कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीत भरती जाहीर केली आहे.

एलआयसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ डिसेंबर २०२५ पासून सुरु झाली आहे. (offering)या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२५ आहे. २८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी भरती झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत होणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, टेक्निकल स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १६.५० ते १९.१५ लाखांचं पॅकेज मिळणार आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी (offering)अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई-आयटी/सीएस, एमसीए, एमटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत विज्ञान किंवा आयटी क्षेत्रात पदवी प्राप्त उमेदवारही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आयटी फील्डमध्ये कामाचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *