राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी हालचाल सुरू झाली असून,(elections)महापालिका निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर राज्यात कधीही आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यावेळी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी राजकीय रणधुमाळी सुरू होणार असून, सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.

यापूर्वी नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका 50 टक्के आरक्षण मर्यादा (elections)ओलांडल्यामुळे पुढे ढकलल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ताज्या माहितीनुसार या दोन्ही महापालिकांसह राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रच घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी घेण्याचा विचार आयोगाकडून केला जात असल्याचेही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 15 ते 17 डिसेंबरदरम्यान महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते. न्यायालयाने निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याने आयोगावर वेळेचे मोठे दडपण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकांसाठी मतदान 12 जानेवारीनंतर होण्याची शक्यता आहे. (elections)विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्याची तयारी आयोगाकडून केली जात असल्याचे समजते. न्यायालयीन आदेश, कायदेशीर अडचणी आणि मर्यादित कालावधी लक्षात घेता निवडणूक आयोग अत्यंत काटेकोर नियोजन करत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मात्र अडचणी कायम आहेत. राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये राजकीय आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार अशा ठिकाणी निवडणुका घेता येणार नाहीत.

त्यामुळे केवळ काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुढे (elections)ढकलण्याचा निर्णय आयोगाला घ्यावा लागल्याचे चित्र आहे.न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारी 2026 या अंतिम मुदतीमुळे निवडणूक आयोगाकडे आता केवळ 50 ते 52 दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे अंदाजानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुका 15 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान पूर्ण केल्या जाऊ शकतात, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापणार, हे निश्चित आहे.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *