देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप येणार आहे.(earthquake)19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे.

19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार आहे.(earthquake) मराठी माणूस पंतप्रधान होईल असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. अमेरिकेतील एक व्यक्ती इस्त्रायलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावले आणि स्टिंग ऑपरेशन केले. ही व्यक्ती लवकरच या बड्या नेत्यांची प्रकरणं समोर आणणार आहे. अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठे राजकीय संकट येईल. अमेरिकेत एक कायदा करणार आहे. त्यामुळे ही व्यक्ती 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. पण ही नेते कोण आहेत, याची आपल्याला काही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही दिसतील. (earthquake)कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलेल असे ते म्हणाले. यापूर्वी सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेतही त्यांनी असाच दावा केला होता. मराठी माणूस लवकरच पंतप्रधानपदी दिसेल असा दावा त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी त्यामागे अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे. अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन फाईल्समुळे तुफान आले आहे. त्यात ट्रम्प यांचे सिंहासन सुद्धा डामाडौल होताना दिसत आहेत. डेमोक्रॅटिक समितीच्या सदस्यांनी चौकशी थांबणार नसल्याचे आणि अहवाल सार्वजनिक करण्याचे सुतोवाच केलेले आहे.

या समितीने परवा डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री यांच्यासोबतचे 19 फोटो सार्वजनिक केले.(earthquake) त्यावरून अमेरिकेत राजकीय वादळ उठलेलं आहे. त्याचा आधारे पृथ्वीराज चव्हाण दावा करत असल्याचे बोलत आहेत. तर भाजपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळला आहे. अमेरिकेतील काही कागदपत्रांआधारे तिथं उलथापालथ होईल. त्या आधारे भारताचा पंतप्रधान कसा बदलणार? असा सवाल भाजपचे नेते विचारत आहेत. त्यांनी मराठी माणूस पंतप्रधानपदी येणार असल्याचा आणि पंतप्रधान बदलण्याचा दावा मान्य नसल्याचे म्हटले आहे. मोदींविरोधात मुद्दाम असे पसरवण्यात येत असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून असा आंतरराष्ट्रीय कट सुरु असल्याचा दावाही नेते करत आहेत.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *