अनेकदा सार्वजनिक वाहतूक जसे की बस, टॅक्सी आणि रिक्षा मिळत (attempts)नसल्यासा प्रवाशांना रॅपिडो सारखे पर्याय मिळत आहे. रॅपिडो सेवेत बाईकवर प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवले जाते. रॅपिडो सेवा महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एका रॅपिडो मोटारसायकल चालकावर एका तरुणीचा विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात ही घटना घडली. (attempts)एका तरुणीने जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केली होती. मात्र रॅपिडो ड्रायव्हरने तरुणीने जे लोकेशन सांगितले होते तेथे नेण्याऐवजी तिला एका निर्जन आणि अंधाऱ्या भागात नेले जिथे. येथे रॅपिडो ड्रायव्हरने बाईक थांबवली आणि तरुणीचा विनयभंग करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक तिच्या मदतीसाठी धावून आले. या घटनेमुळे रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (attempts)तरुणीसह गैरवर्तन करणाऱ्या रॅपिडो ड्रायव्हरला मदतीसाठी आलेले स्थानिक मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संतप्त जमावाला शांत केले. पोलिसांनी सांगितले की सध्या ते तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात बेंगळुरूमध्येही अशीच एक घटना घडली होती. एका रॅपिडो चालकाने एका महिला प्रवाशाला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवा महिलांसाठी किती सुरक्षित आहेत यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे

बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *