हिवाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढते. (Scientists)मात्र, रोजचा आवडता गरम चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, खूप गरम तापमानातील चहा किंवा कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये घशाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हा कर्करोग अन्ननलिकेशी संबंधित असून त्याला एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असे म्हणतात.हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झाले आहे. यूके बायोबँकअंतर्गत सुमारे साडेचार लाख लोकांचा दहा वर्षांहून अधिक काळ अभ्यास करण्यात आला. या दीर्घकालीन अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की अत्यंत गरम पेये पिणे हे अन्ननलिकेच्या स्क्वॅमस सेल कार्सिनोमासाठी एक महत्त्वाचा धोक्याचा घटक ठरू शकते.

संशोधकांच्या माहितीनुसार, जे लोक दररोज आठ कपांपेक्षा जास्त खूप गरम चहा किंवा कॉफी पितात, त्यांना हा कर्करोग होण्याचा धोका सुमारे 5.64 पट अधिक आढळला. (Scientists)अभ्यासात हेही नमूद करण्यात आले आहे की हा धोका केवळ आशिया किंवा दक्षिण अमेरिकेपुरता मर्यादित नसून, यूकेसारख्या पाश्चात्य देशांमध्येही तो तितकाच गंभीर आहे.या संशोधनातून समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे कर्करोगाचा धोका पेयाच्या प्रकाराशी संबंधित नसून त्याच्या तापमानाशी संबंधित आहे. चहा असो, कॉफी असो किंवा दूध असो, जर पेय खूप गरम असेल तर धोका वाढतो. अभ्यासात चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये जवळपास समान धोका दिसून आला आहे.

तसेच, जितक्या अधिक प्रमाणात खूप गरम पेये प्यायली जातात, (Scientists)तितका कर्करोगाचा धोका वाढतो, असेही संशोधनात आढळून आले. सुमारे 11.6 वर्षांच्या कालावधीत अभ्यासातील लोकांमध्ये 242 कर्करोगाचे रुग्ण नोंदवले गेले.इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने यापूर्वीच खूप गरम पेयांबाबत इशारा दिला असून, हा कर्करोग तुलनेने दुर्मिळ असला तरी अशा सवयी असलेल्या व्यक्तींमध्ये धोका लक्षणीय वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.संशोधकांनी नागरिकांना सल्ला दिला आहे की चहा किंवा कॉफी थोडी थंड झाल्यानंतर पिण्याची सवय लावल्यास हा धोका कमी होऊ शकतो. चहा आणि कॉफीचे आरोग्यदायी फायदे असले तरी, खूप गरम तापमानातील पेये टाळणे हेच आरोग्यासाठी सुरक्षित ठरू शकते, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
हेही वाचा :
जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे
बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा