भारतात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण कमी नाही. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की,(body) दारू आपल्या शरीरात किती काळ राहते. म्हणजेच दारू पिणाऱ्या व्यक्तीला शुद्धीवर येण्यासाठी किती वेळ लागतो. मुळात याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. लिंबू पाणी किंवा काही आंबट खाल्लं की दारू उतरते असं म्हणतात. पण यामध्ये किती तथ्य आहेतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात दारू किती वेळ राहते हे पूर्णपणे त्याची प्रकृती, आरोग्य आणि त्याला असलेल्या सवयींवर अवलंबून आहे. दारू पूर्णपणे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साधारपणे five half-lives लागतात. दारूचं हाफ-लाईफ चार ते पाच तासांचं असतं.

याचाच अर्थ शरीराला ती पूर्णपणे बाहेर टाकण्यासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागू शकतो.(body) ऑस्टिनच्या केअरहाईव्ह हेल्थच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुनीत सिंग यांनी दारू शरीरात गेल्यावर कशी प्रक्रिया सुरु होते हे समजावून सांगितलं आहे.द इकोनॉमिक्स टाईम्सला माहिती देताना डॉ. सुनित सिंग यांनी सांगितलं की, दारू शरीरात गेल्यानंतर ती बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास हा मेटाबॉलिझम प्रक्रियेतून जातो. ही प्रक्रिया पोटात सुरू होते. जिथे वेगवेगळे एन्झाईम्स दारूचे विघटन सुरू करतात.
दारूचं अधिक प्रमाण हे थेट लहान आतड्यात जातं आणि तिथून (body) रक्ताद्वारे शोषलं जातं. रक्तात गेल्यानंतर दारू यकृतात पोहोचते. या ठिकाणी दारूचं ९०% पेक्षा जास्त मेटाबॉलिझम होतं. यकृतच मुख्य काम करतं. दारू यकृतात पोहोचल्यावर ती अॅसिटाल्डिहाइडमध्ये बदलते ज्यामुळे मळमळ, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणं असे त्रास होतात.एका ड्रिंकमध्ये बिअर, वाईन किंवा शॉट दारू रक्तात गेल्यानंतर साधारण एका तासात पीकवर पोहोचते. त्यानंतर ती पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी शरीराला अजूनही २० ते २५ तास लागतात.

डॉ. सिंग यांनी स्पष्ट केलं की, एका ड्रिंकला शरीरातून पूर्णपणे बाहेर (body) पडण्यासाठी एक दिवस लागतो. मुळात यकृताला फरक पडत नाही की तुम्ही बिअर, वाईन किंवा कॉकटेल पियात. यकृत त्याची प्रक्रिया दारू म्हणूनच करतं.दारूचे अंश रक्तात साधारणपणे 12 तासांपर्यंत आढळू शकतात.ब्रिथ अॅनालायझरद्वारे श्वासातून दारूची उपस्थिती 12 ते 24 तासांपर्यंत ओळखता येऊ शकते.लघवीमध्ये दारूचे अंश 12 ते 72 तासांपर्यंत आढळण्याची शक्यता असते.लाळेद्वारे दारूचे 12 ते 48 तासांपर्यंत कळण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क