स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लक्षवेधी कारवाई केली आहे.(leader)अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात 37 जागा जिंकल्या असून, शरद पवारांना मात्र 7 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांची तयारी सुरु झाली असताना, यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार का? यासंदर्भात चर्चा रंगली आहे. अजित पवारांना महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे चुकीची राजकीय संस्कृती नसून, मुक्त संवाद होतो. कोणीही एकमेकांशी सहजपणे बोलू शकतं. जर बोलणं झालं असेल तर ते कृतीतून दिसेल. आमच्या काल रात्री महाविकास आघाडीच्या जागांसंदर्भात चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. आता अंतिम निर्णय खुद्द शरद पवार घेतील. शरद पवारांवर आमची श्रद्धा असून, तेच महाविकास आघाडीला दिशा दाखवू शकतात,” असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.

“अजित पवार महाविकास आघाडीत आले तर आनंद आहे.(leader) पण तसा प्रस्ताव आणणारा किंवा त्यावर चर्चा करणाऱ्या वर्गात मी नाही. त्याच्यामुळे हा विषय माझ्यासमोर नाही. आज पहाटेपर्यंत जागावाटपासंदर्भातील चर्चेची शेवटची फेरी असून, आता वरिष्ठच निर्णय घेतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “माझे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे आहेत. ते काय आदेश देतात हा औत्सुक्याचा विषय आहे. मी साहेबांवर श्रद्धा ठेवून येथे आलो आहे. त्यामुळे मला काहीतरी मिळेल आणि मिळालं नाही तर रुसून जाणार अशी बाब नाही. आजही यासंदर्भात योग्य तख्ता ठेवला असून, मी जाहीरनामा दिल आहे. जागावापाचा आणि आघाडी करण्याचा निर्णय शरद पवारांचा असेल,” असं त्यांनी सांगितलं.

“उद्या एखादा दहशतवाद्याला जेलमध्ये टाकलं असेल (leader)आणि भाजपाला तो एखाद्या मतदारसंघात जिंकू शकतो असं वाटलं तर त्यालाही पक्षात घेतली. मित्रपक्ष किंवा विरोधी पक्षातील बदनाम किंवा नाव गमावलेले नेते होलसेल रेटने घेत आहेत. याचं चिंतन आम्हीदेखील आणि सर्वसामान्यांनी केलं पाहिजे,” अशी टीका त्यांनी केली. ज्या जागेवर आम्ही लढू तिथे तुतारीच्या चिन्हावर लढू. भल्या त्या कमी किंवा जास्त जागा असतील असं सांगत त्यांनी घड्याळाच्या चिन्हावर लढण्यचा दावा फेटाळला. चर्चा राज्या स्तरावर असून आमटी, काँग्रेस, आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वरिष्ठ टीम एकत्र होती. यावेळी आमच्यात बेबनवा नव्हता असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसची ताकद नाकारुन चालणार नाही. राज्य म्हणून विचार केला तर कुठे तरी काँग्रेस जो आत कुठेही सत्तेत नाही तो पक्ष अजित पवारांच्या पक्षापेरक्षा जास्त जागा मिळवतो हीदेखील उल्लेखनीय बाब आहे. त्याच्यामुळे अमुक एखादा पक्ष अशी चर्चा करता येणार नाही राजकारणात वेगवेगळे पर्याय असतात. त्यामुळे काँग्रेसकडे दुर्लक्ष करु शकत नाही असं ते म्हणाले.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक