धकाधकीच्या जीवनात बरेच लोक झोपेला कमी वेळ आणि कमी प्राधान्य देतात.(effect) काही लोक यामुळेच ७ सात झोपण्याऐवजी फक्त ५ तास झोपतात. रोज काहींना कामासाठी लवकर उठावं लागत असेल किंवा तरुणांना सकाळचे कॉलेज असेल, क्लासेससाठी लवकर उठावं लागत असेल. पण ही सवय तुमच्या संपूर्ण शरीरासाठी खूप धोक्यादायक ठरू शकते. याची तुम्हाला लक्षणं किंवा शरीरात होणारे बदल जाणवत नाहीत. कमी झोप घेणं म्हणजे फक्त दुसऱ्या दिवशी थकवा जाणवणं एवढ्यावरच याचा परिणाम होतो हा अनेकांचा गैरसमज आहे असं तज्ज्ञ सांगतात.कमी झोपेमुळे सगळ्यात आधी तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित फोकस करता येत नाही, एकाग्रता कमी होते, एखादा महत्वाचा निर्णय घेताना खूप गोंधळ होतो, व्यवस्थित योग्य निर्णय घेता येत नाही. नवीन गोष्टी लक्षात ठेवणं किंवा शिकणं कठीण वाटतं. याने एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा वेग होतो आणि वाहन चालवताना किंवा कामाच्या ठिकाणी अपघाताचा धोका वाढतो. रोजच्या सवयीमध्ये चिडचिडपणा, मूड स्विंग्स, स्ट्रेस वाढतो.

बरेच दिवस सलग झोप कमी झाली तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसतो. (effect)तुम्हाला खूप धकवा येतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून ते इतर संसर्गजन्य आजार वाढतात. तुमच्या हार्टवर सुद्धा याचा परिणाम होतो.उच्च रक्तदाब, हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यासोबतच झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचा बॅलेन्स बिघडतो. त्यामुळे जास्त भूक लागणं, वजन वाढणं आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

शरीराच्या पेशींवरही कमी झोपेचा परिणाम दिसून येतो. पेशींचं aging process होतं, muscle recovery आणि वाढ योग्य प्रकारे होत नाही. भावना नियंत्रित करणं कठीण होतं आणि (effect)नातेसंबंध हाताळताना खूप अडचणी येतात. एकूणच, दररोज ७ ते ९ तासांची झोप शरीराला आवश्यक आहे. जर ती मिळाली नाही तर याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून झोपेसाठी किमान ७ तास काढणं खूप गरजेचं आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक