राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसतोय.(expected)काही भागात कडाक्याची थंडी आहे तर काही भागात पाऊस पडतोय. यासोबतच मुंबई पुण्यात प्रचंड वायू प्रदूषण वाढलंय. हवा घातक झाली. मुंबईतील हवेबद्दल मोठी अपडेट येताना दिसत असून मुंबईत वायू प्रदूषणाची स्थिती मध्यम श्रेणीत आहे, पण त्यात सुधारणा होऊ शकते किंवा आणखी वाईट होण्याची शक्यता देखील असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आज मुंबईतील हवामान सामान्यतः आर्द्र आणि उबदार असू शकते. तापमान साधारण 25°C ते 32°C दरम्यान राहू शकते. विशेषतः संध्याकाळी. हवामान कधीही बदलू शकते, त्यामुळे त्यानुसार बाहेर जाताना सावधगिरी बाळगने गरजेचे आहे.

मुंबईतील AQI साधारणतः 100-150 च्या आसपास मध्यम श्रेणीत असू शकतो.(expected) याचा अर्थ हवा थोडी प्रदूषित आहे, पण ती तितकी धोकादायक नाही. ज्या लोकांना श्वासाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी बाहेर जाणं टाळणे किंवा मास्क वापरणे चांगलं राहणार आहे. सकाळच वातावरण उबदार, हवेतील आर्द्रता जास्त आणि हलका वारा असणार आहे. तापमान साधारण 25°C आसपास आहे. दुपारनंतर तापमान वाढून 32°C पर्यंत जाऊन, उकडते वातावरण राहण्याची शक्यता आहे.

संध्याकाळी हलका पाऊस किंवा वारा येऊ शकतो. (expected)तापमान 28-30°C च्या आसपास असू शकते. रात्री थोडा गारवा आणि हवामान हलकं, तापमान 25°C पेक्षा कमी होईल. सर्वसाधारणपणे, आजचा दिवस काही प्रमाणात उबदार आणि थोडा आर्द्र असू शकतो. यामुळे नागरिकांनी पाणी अधिक प्यावे. मुंबईकरांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आपली काळजी घ्यावी असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला आहे. 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. आयएमडीने उत्तर भारत आणि ईशान्येकडील राज्यांसाठीही सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. २६ ते २८ डिसेंबर दरम्यान उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या उंच भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *