नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.(celebrating) याच पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त राज्यातील मद्यविक्रीची दुकानं, बिअर बार आणि परवाना कक्षांना नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास विशेष सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी नागरिकांना मध्यरात्रीनंतरही मद्यविक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही आस्थापनांना थेट पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून, त्यामुळे थर्डी फर्स्टचा जल्लोष अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

एफएल-2 म्हणजेच विदेशी मद्य किरकोळ विक्रीच्या दुकानांना(celebrating) रात्री 10.30 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उच्च दर्जा व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल-2 दुकानांना रात्री 11.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत सूट मिळणार आहे. एफएलडब्ल्यू-2 आणि एफएलबीआर-2 परवाना धारकांना देखील रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनाही या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

एफएल-3 परवाना कक्ष आणि एफएल-4 क्लब अनुज्ञप्ती यांना पोलीस(celebrating) आयुक्तालयाच्या हद्दीत रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर असलेल्या आस्थापनांना रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सूट मिळणार आहे.नमुना ‘ई’ म्हणजेच बिअर बार आणि ई-2 परवानाधारकांना मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीएल-3 परवानाधारकांना महानगरपालिका तसेच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 1 वाजेपर्यंत, तर इतर ठिकाणी रात्री 10 ते पहाटे 1 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.दरम्यान, वेळेची शिथिलता दिली असली तरी सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार या वेळा कमी करू शकतील. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून, ड्रंक अँड ड्राइव्ह रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विशेष दक्ष राहणार आहेत. तसेच अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथकं तैनात राहणार आहेत.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल