महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी

लोकसभा निवडणूक(politics) मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत. उदयनराज भोसले यांनी ठाकरे गटाचे उमेदवार शशिकात शिंदे याचा पराभव केला. विजयानंतर उदयनराजे भावूक झाले. उदयनराजे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला.

2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या(politics) पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली.

मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल 87 हजार मतांनी धूळ चारली होती.

हेही वाचा :

महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली…

टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली ‘इतकी’ वाढ

सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले