लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या नोव्हेंबरपासूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.(tension)लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते देण्यात आले. त्यानंतर आता डिसेंबर महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. तरीही हप्ता न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता या योजनेत काही महिलांना लाभ मिळणार नाहीये.लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याचाही हप्ता एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

४५०० रुपये महिलांना एकत्र येणारअसल्याचे बोलले जात आहे.(tension) दरम्यान, यातील काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.लाडकी बहीण योजनेत काही महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही. याचसोबत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे.यासाठी शेवटचे ३ दिवस उरले आहेत.

दरम्यान, ज्या महिला मुदतीआधी केवायसी करणार नाही त्यांचाही लाभ बंद होणार आहे(tension) त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.राज्यातील जवळपास कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील लाखो महिलांनी अजूनही केवायसी केले नाही. त्यांच्याकडे फक्त काही दिवसांची मुदत आहे. जर महिलांनी त्याआधी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका