बस, मेट्रो, ट्रेन अथवा इतर सार्वजनिक वाहनात प्रवास करताना मुलींची (moving)छेड काढल्याच्या घटनेने संताप व्यक्त होतो. एसटी बसमध्ये मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलाने सोशल मीडियावर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितलाय. ७० वर्षांच्या व्यक्तीने धावत्या बसमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. अभिषेकचा हा व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून मुलेही सुरक्षित राहिले नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.अभिषेकनं व्हिडिओत जे सांगितलं ते ऐकून प्रत्येक व्यक्तीला विचार करायला भाग पाडले. सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना त्यानं अनुभव शेअर केला अन् त्या ७० वर्षाच्या आजोबाची म्हातारचळ जगासमोर आली. त्या मुलाने व्हिडिओत सांगितले की चालत्या बसमध्ये एका वृद्धाने त्याचा छळ केला.

त्या मुलाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. (moving)या व्हिडओवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.बसमध्ये त्या वृद्ध व्यक्तीने प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचे अभिषेकने व्हिडिओत सांगितलेय. त्याचा हा धक्कादायक अनुभवाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. शेजारी बसलेल्या ७० वर्षाच्या व्यक्तीने माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, असे मुलाने व्हिडिओत सांगितलेय. त्याने हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्या मुलाने ७० वर्षाच्या वद्धाला झापले.

त्या वृद्ध व्यक्तीने घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला. (moving)असे काही घडेल याचा विचारही केला नव्हता, असे अभिषेकने व्हिडिओत आरोप केलाय. तो म्हणाला की, या घटनेमुळे लैंगिक छळ हा वय अथवा लिंग पाहून केला जात नाही. समाजात घाणेरड्या विचाराचे लोक भरलेले आहेत. दरम्यान, मुले देखील नेहमीच सुरक्षित नसतात. याबद्दल जागरूकता पसरवण्याची वेळ आली आहे, असे कॅप्शन टाकत अभिषेकने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *