२०२५ सालच्या ‘गुगल इयर इन सर्च’ अहवालातून भारतात सर्च केल्या (searched)गेलेल्या काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्या अत्यंत भयानक आणि धक्कादायक मानल्या जात आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि विशिष्ट तांत्रिक शब्दांच्या संदर्भात असलेल्या या डेटाने अनेकांना हैराण केले आहे.

१. 5201314 एक सीक्रेट नंबर: भारतीयांनी या सात अंकी नंबरचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला .(searched)हा एक कोड असून याचा वापर सोशल मीडियावर “मी तुला आयुष्यभर प्रेम करेन” या अर्थाने केला जात होता, परंतु याच्या अतिवापरामुळे आणि सीक्रेटमुळे हा टॉप सर्च ठरला.
२. ‘AI Boyfriend’ चॅट: गुगलच्या रात्रीच्या सर्च डेटानुसार रात्री १० ते पहाटे ४, मुलींमध्ये ‘AI Boyfriend’ चॅट सर्चमध्ये ६५% वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे २५% मुलींनी खऱ्या मानवी संबंधांपेक्षा एआय चॅटला प्राधान्य दिल्याचे या डेटावरून समोर आले आहे.
३. डिजीटल अरेस्ट: सायबर गुन्हेगारांकडून लोकांना व्हर्च्युअली ओलीस ठेवून लुटण्याच्या घटना वाढल्याने याबद्दल माहिती घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले.
४. Ceasefire : जागतिक स्तरावरील वाढत्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ‘Ceasefire’ म्हणजे काय हे भारतीयांनी सर्वाधिक वेळा शोधले, जे जागतिक अशांततेबद्दलची भीती दर्शवते
५. निद्रानाश आणि मानसिक आरोग्य: रात्रीच्या वेळी ‘झोप न येण्यावर घरगुती उपाय’ शोधणाऱ्यांच्या संख्येत ५५% वाढ झाली आहे, जे वाढता मानसिक ताण अधोरेखित करते
६. AQI आणि भूकंपाचे इशारे: वाढत्या प्रदूषणामुळे ‘Air Quality near me’ आणि नैसर्गिक आपत्तीच्या भीतीपोटी ‘Earthquake near me’ या प्रश्नांचे प्रमाण लक्षणीय होते.
७. कायदेशीर धोके : चुकीचे शब्द किंवा ‘बॉम्ब’, ‘हॅकिंग’ (searched)यांसारख्या गोष्टी सर्च केल्यामुळे जेल होऊ शकते का, याबद्दलच्या भीतीदायक प्रश्नांचे प्रमाणही अधिक होते.

८. आरोग्यविषयक गंभीर लक्षणे: किरकोळ आजारांऐवजी गंभीर (searched)आजारांची लक्षणे जसे की ‘डोकेदुखी’ आणि ‘श्वसनाचा त्रास’ यांबद्दल भारतीयांनी गुगलला डॉक्टरांच्या जागी प्राधान्य दिले जे आरोग्याबद्दलची चिंता वाढवणारे आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका