सांगली महानगरपालिकेत मविआ आणि महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे.(independently) सांगली महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं रणनीती आखलीय. तर तिकडे जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटलांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे मविआनं देखील या निवडणुकीसाठी कंबर कसलीय. सांगली पालिकेत महायुती म्हणून लढण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं एकमत झालंय, त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.सांगलीत भाजप-शिवसेनेत एकत्र लढण्यावर एकमत झालं असलं तरी राष्ट्रवादीनं मात्र, स्वबळाचा नारा दिलाय. राष्ट्रवादीनं 30 जागांची मागणी केलीय. योग्य जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेला दिलाय. सांगली-मिरज कुपवाडा महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपनं आलटून-पालटून सत्ता उपभोगलीय. मात्र, 2018 मध्ये भाजपनं सांगली पालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली होती.

सांगली पालिकेतील 78 जागांपैकी भाजपला 41 जागा मिळाल्या होत्या, (independently)काँग्रेसला 20 राष्ट्रवादीला 15 आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे मविआ आणि महायुतीत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग आणि आऊटगोईंग देखील पाहायला मिळालंय. त्यामुळे सध्या भाजपकडे माजी नगरसेवकांची संख्या 51 आहे. काँग्रेसकडे 11 माजी नगरसेवक, पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 माजी नगरसेवक तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 7 माजी नगरसेवक आहेत. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे एकही माजी नगरसेवक नाही.

तर तिकडे मविआनं देखील पालिकेत एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. (independently)काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना मविआ म्हणूनच सांगलीत लढणार आहेत. मात्र, महायुतीकडे भाऊगर्दी झाल्यानं मविआची तगडे उमेदवार मिळवण्यासाठी चागंलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड असे तीन शहरांची मिळून एक महापालिका आहे. मात्र, या तिन्ही शहरामध्ये अजून मुलभूतसुविधांचा अभाव दिसून येतोय. त्यामुळे याच प्रश्नावर सांगली पालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *