सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. त्यामुळे हात-पायांच्या दुखण्यांच्या समस्या वाढतात. (ignore) पण तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळ्या समस्या दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. कारण लंग कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही पहिल्यांदा हाता-पायवर दिसतात. पुढील लेखात आपण याबाबत आपण संपूर्ण माहिती लक्षणे जाणून घेणार आहोत.फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणं फक्त खोकला, दम लागणे किंवा वजन कमी होणं इतकीच नसतात. कधीकधी हा कॅन्सर छातीत त्रास सुरू होण्याच्या अगोदरच हाता-पायांवर दिसतो. यालाच पॅरानिओप्लास्टिक आणि व्हॅस्क्युलर लक्षणं म्हटलं जातं. बोटं, नखं, मनगट, गुडघे, त्वचा, स्नायू आणि नसांमध्ये अचानक हे बदल दिसतात.

काही रुग्णांमध्ये बोटांची टोकं फुगलेली दिसतात, नखं खालच्या दिशेला वाकतात,(ignore) नखं-त्वचेचा कोपरा वेगळ्या रंगाचा मळकट दिसतो, बोटांमध्ये उष्णता जाणवते. यालाच नेल क्लबिंग म्हणतात आणि ती नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सरशी संबंधित असतात. असं तज्ज्ञ सांगतात. याचं कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमधला असामान्य बदल आणि कनेक्टिव्ह टिश्यूंची वाढ आहे. त्यामुळे छाती संबंधीत आजारांची तपासणी करणं महत्वाचं ठरतं.

मनगट आणि गुडघ्यांमध्ये सूज, वेदना आणि हाडं दुखत असतील(ignore) तर याला हायपरट्रॉफिक पल्मनरी ऑस्टिओआर्थ्रोपॅथी म्हणतात. जी लंग कॅन्सरशी संबंधित अवस्था आहे. प्रौढांमध्ये अचानक अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टर बऱ्याचदा लपलेल्या लंग कॅन्सर असल्याचा संशय घेतात.एका बाजूचा पाय अचानक सुजत असेल, गरम वाटत असेल आणि खूप दुखत असेल तर हे डीप व्हेन थ्रोम्बोसिसचं लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखता येतात. ही अवस्था जीवघेणी सुद्धा असू शकते. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *