तरुण मुलं- मुली ही खूप फीट असतात, असं म्हंटलं जातं. या वयात तरुणमंडळी(habits) दिवसरात्र मेहनत करत असतात आणि त्यांचं शरीर त्यांना उत्तम प्रमारे साध देत असतं. पण सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतं. पुढील लेखात आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.सध्याच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर, किडनी डॅमेज, हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारखे आजार वाढताना दिसत आहेत, यामागे त्यांची चुकीची जीवनशैली हेच मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

हैदराबादमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. साद्विक रघुराम वाय यांनी (habits)सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये 20 व्या वर्षातील मुलांच्या काही सवयींनी भविष्यात कॅन्सरचा धोका वाढवू शकतो असा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाला वाटत असतं की, आपण हेल्दी, फीट आहोत पण शरीरातल्या पेशींच्या हालचालींबाबत त्यांना माहिती नसते.तज्ज्ञ सांगतात की अनेक दिवसांची अपुरी झोप घेणं ही एक सगळ्यात धोकादायक सवय आहे. उशिरापर्यंत जागरण करणं आणि अपूर्ण झोप घेतल्याने शरीराची जैविक घड्याळ बिघडतं. बरेच दिवस झोप पूर्ण न झाल्यास पेशींना स्वतःची दुरुस्ती करण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

आजच्या धावपळीत जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं वाढलंय.(habits) ही एक टेन्शनची बाब आहे. पॅकेटमधले, तळलेल्या आणि फास्ट फूडमध्ये पौष्टिक घटक कमी आणि रसायनं जास्त असतात. अशा अन्नामुळे शरीरात सूज वाढते, पचनसंस्था बिघडते आणि कालांतराने हे बदल कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी जोडले जाऊ शकतात.डेस्क जॉब करणाऱ्या तरुणांमध्ये सतत तासनतास बसून राहण्याची सवय वाढली आहे. शरीराला हालचाल न मिळाल्यास कोलन आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक तासाला थोडं चालणं-फिरणं आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *