थोडी प्यायल्याने काही होत नाही रे, असं म्हणणाऱ्या तळीरामांना (alcohol)धक्का देणारं संशोधन समोर आलं आहे. रोज फक्त एक पेग मद्य प्यायलं तरी कॅन्सरचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो असं एका संशोधनामधून समोर आलं आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने केलेल्या अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे. दारुचे कमी प्रमाणात नियमित सेवन केले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा निष्कर्ष मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने अॅक्ट्रेक एका अभ्यासातून काढला आहे. ओपन अॅक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, थोड्या प्रमाणात रोज मद्यपान केलं तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा गालांच्या आतल्या भागातील कर्करोगाचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो.

यामध्ये महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक (alcohol)असल्याचे स्पष्ट झाले. तंबाखू सेवन आणि मद्यपानची सवय एकत्र असतील तर कर्करोगाचा धोका अधिक वाढतो असंही अभ्यासात म्हटलं आहे. 2010 ते 2021 या कालावधीत बक्कल म्युकोसा कर्करोग निदान झालेल्या 1803 रुग्णांची तुलना 1903 निरोगी व्यक्तींशी करण्यात आली. अभ्यासात 11 आंतरराष्ट्रीय व 30 स्थानिक मद्यप्रकारांचा समावेश होता. अभ्यासातून असेही स्पष्ट झाले की, तंबाखू सेवन आणि मद्यपान या दोन्ही सवयी एकत्र असतील, तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो.

मद्यपेयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गट-1 कर्करोगकारक’ म्हणून वर्गीकृत केले आहे, (alcohol)असं टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. अॅक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी देशी मद्याच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याकडे लक्ष वेधले. सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांच्या मते, भारतातील बक्कल म्युकोसा कर्करोगाच्या सुमारे 11.5 टक्के प्रकरणे थेट मद्यपानाशी संबंधित आहेत.भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. संशोधकांच्या मते दरवर्षी अंदाजे 1 लाख 43 हजार 759 नवीन रुग्ण आढळतात व 79,979 मृत्यू या आजारामुळे होतात. भारतीय पुरुषांमध्ये दर एक लाखांमागे सुमारे १५ इतका त्याचा प्रसार आहे. भारतात तोंडाच्या कर्करोगाचा प्रमुख प्रकार हा गालांच्या व ओठांच्या आतल्या मऊ गुलाबी आवरणाचा बक्कल म्युकोसा कर्करोग आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *