थंडीत शरीराची हालचाल कमी होते. कोणतही काम करणं कंटाळवाण वाटतं.(habits) सतत दिवसभर एका जागी बसून राहणं अनेक लोक पसंत करतात. काही लोक खाण्यापिण्याच्या वेळाही पाळत नाहीत. कधीकधी लोक जड पदार्थ खाऊन एकाच जागी बसून राहतात. याचा नकळत परिणाम तुमच्या ब्लड प्रेशरवर होत असतो. तज्ज्ञांनी पुढे काही थंडीत नकळत होणाऱ्या चुकांबद्दल सांगितले आहे. या टाळून तुम्ही हेल्दी लाइफ नक्कीच अनुभवू शकता.हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल असलेल्यांनी थंडीत विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत सकाळी कोणतही काम करताना जास्त हालचाल करणे टाळले पाहिजे. कारण झोपेतून उठल्यानंतर शरीरात नैसर्गिकरित्या मॉर्निंग सर्ज होते. म्हणजेच तुमच्या हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. त्याने शरीर दिवसभर काम करण्यासाठी तयार होतं. यात तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केलीत की तुमचं ब्लड प्रेशर वाढतं.

ब्लड प्रेशर किंवा कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात काही(habits)नियम पाळले पाहिजे. जसे की, खूप जास्त कॅफिन असलेली कॉफी किंवा स्ट्राँग कॉफी टाळली पाहिजे. कारण याच्या सेवनाने तुमचा रक्तदाब तात्पुरता वाढतो आणि हार्ट बीटपण वाढते. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना कॅफीनयुक्त पदार्थ टाळायला सांगतात.बदलत्या लाइफस्टाइलमध्ये सिगारेट ओढण्याची सवय अनेकांना असते. ही एक फॅशनच झालीये. पण ही सवय तुमचं शरीर खिळखिळ करून टाकते. कारण सिगारेटचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाबात झटपट वाढ होते आणि हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो.

तुम्ही जर नाश्त्याला मस्त गरमा गरम तेलकट पदार्थ खात असाल (habits)) तर तुमच्या रक्तातला फॅट झपाट्याने वाढतो. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्समुळे कोलेस्टेरॉल वाढतं. यामध्ये बेकरीचे आयटम्स, प्रोसेस्ड फूड यांचा सुद्धा समावेश होतो. यामुळे BP वाढू शकतो. कारण यामध्ये जास्त मीठ असतं. त्याने शरीरात पाणी साचतं, रक्तदाब वाढतो आणि हार्ट अटॅकचाही धोका वाढतो. त्यामुळे या रुग्णांनी उठल्यावर कोणत्याही हालचाली करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा