राज्यात तापमानाचा पारा भलताच घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.(temperature)महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने वातावरण ढगाळ स्वरूपाचं आहे. तसेच सकाळी आणि राती हवेत गारवा, धुके आणि दव पाहायला मिळत आहेत. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज तापमानात चढ उतार सुरु राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला आहे.काल परभणी येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७ अंश सेल्सिअस, धुळे येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर पुणे, नाशिक, जेऊर, भंडारा, गोंदिया येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तसेच वातावरणात गारठा असून तापमानात चढ उतार असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, (temperature)तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. आज मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. परभणीमध्ये राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान ?
निफाड : ८
पुणे: ९.५
जळगाव: ११
कोल्हापूर: १४.८
महाबळेश्वर: १२.२
मालेगाव: १२
नाशिक: १०
सांगली: १३.५
सातारा: १०.५
सोलापूर: १४
छत्रपती संभाजीनगर: १०.६
परभणी: ६
बीड: १०.५
अकोला: १४.५
अमरावती:(temperature) ११.५
बुलढाणा: १३.४
गोंदिया: १०
नागपूर: १०.६
वाशीम: १०.६
वर्धा: ११.५
यवतमाळ: ११
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा