उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण (chill) महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. मुंबईत दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी पहाटेच्या किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना गुलाबी थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागातही पारा घसरला असून जळगावमध्ये ९.२ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्राच्या प्रभावामुळे मुंबईत तापमानाचा पारा फार खाली जात नसला तरी, (chill)गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. सांताक्रूझ येथे १९.४ अंश, तर कुलाबा येथे २०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विशेषतः उपनगरांमध्ये आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या भागात थंडीचा प्रभाव अधिक आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांच्या अंगावर आता उबदार कपडे दिसू लागले आहेत.
Mदरम्यान, येत्या ४८ ते ७२ तासांत राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानातील ही घट अशीच कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे कोकण किनारपट्टीवरही आता थंडीची चाहूल लागली असून रत्नागिरीत पारा १८.७ अंशांपर्यंत खाली आला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव सर्वाधिक असून नाशिक (१२.६° से.), पुणे (१३.५° से.) आणि अहिल्यानगर (१२.३° से.) येथे बोचरी थंडी जाणवत आहे.

मराठवाड्यात धाराशिवमध्ये १२.४ अंश, तर छत्रपती (chill) संभाजीनगरमध्ये १३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातही नागपूर (१२.७° से.) आणि ब्रह्मपुरी (१३.९° से.) गारठले आहेत. अकोला, अमरावती आणि वर्धा परिसरातही पहाटेच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा