शिक्षण पूर्ण झालं असेल अन् नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (opportunities) तुम्हाला सरकारी कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. डीआरडीओमध्ये पेड इंटर्नशिपसाठी भरती होणार आहे. डीआरडीओमध्ये हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ही इंटर्नशिपची संधी आहे. ही इंटर्नशिप ६ महिन्यांसाठी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

डीआरडीओमध्ये एकूण ४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. (opportunities) यामध्ये केमिकल, इंजिनियरिंग, फिजिक्स, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या विषयात पदवी प्राप्त उमेदवारांसाठी कामाची संधी आहे. एकूण ८ विभागांमध्ये ही भरती होणार आहे.इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.४० पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
डीआडीओमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची (opportunities) शेवटची तारीख २० जानेवारी २०२६ आहे. ही इंटर्नशिप ६ महिन्यांसाठी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला ५००० रुपये पगार मिळणार आहे. ही इंटर्नशिप HEMRL, सुतारवाड़ी, पुणे – 411021 येथे असणार आहे.त्यामुळे तुम्हाला तिथे जावे लागेल. इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करायचा आहे.हा फॉर्म भरायचा आहे. त्यावर नाव, आधार नंबर, शैक्षणिक माहिती सर्व लिहायचं आहे. यानंतर सही आणि फोटो लावा.यानंतर हा फॉर्म द डायरेक्टर, HERML, सुतारवाड़ी, पुणे 411021 एचआर विभागात पाठवायचा आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन