निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुत्र्यांची निर्दयीपणे (week) हत्या केल्याची खळबळजनक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काही गावांतील सरपंचांनी निवडणुकीत गावकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या नादात एका आठवड्यात जवळपास ५०० कुत्र्यांना ठार मारलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मागील आठवडाभरात अनेक गावांमध्ये ५०० कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राणीमित्र अडुलापुरम गौतम यांनी १२ जानेवारीला तक्रार दाखल केली आहे. त्यात हा गंभीर आरोप केला आहे. कामारेड्डी जिल्ह्यातील भवानीपेठ, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारमेश्वरपल्लीसह अनेक गावांमधील भटक्या कुत्र्यांना कट रचून ठार मारल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच जवळपास २०० भटक्या कुत्र्यांना ठार मारलं आहे, असा दावाही त्यांनी केला.

तक्रारीनुसार, गौतम यांना १२ जानेवारीला दुपारी साधारण तीनच्या (week) सुमारास कुत्र्यांची सामूहिक हत्या केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. गावच्या सरपंचाच्या सांगण्यावरून कुत्र्यांना ठार मारले आहे, असा आरोपही गौतम यांनी केला. कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणात सामील असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पाच गावांतील सरपंच, किशोर पांडे या व्यक्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन दिले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे.
कुत्र्यांना ठार मारल्यानंतर त्यांचे मृतदेह गावाच्या बाहेर पुरण्यात आले होते. (week) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदनासाठी पुरलेले कुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पुढील तपास सुरू आहे.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही उमेदवारांनी अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुकांआधी काही उमेदवारांनी हे आश्वासन दिले होते. भटके कुत्रे आणि माकडांचा बंदोबस्त करू, असे उमेदवारांनी सांगितले होते. आता भटक्या कुत्र्यांना ठार मारून हे आश्वासन पूर्ण केले जात आहे, असा दावाही गावकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन