रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(recruitment) आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. १५ जानेवारीपासून तुम्ही अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे २० दिवसांचा कालावधी आहे.

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. (recruitment)ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत असणार आहे. एकूण २९१ अनारक्षित पदांसाठी भरती केली जाणार आहे. यानंतर ८३ ओबीसी, ५१ ईडब्ल्यूएस, ५८ एसटी, ८९ एससी जागा आरक्षित आहेत.रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी १० पास उमेदवार अर्ज करु शकतात. (recruitment)अंडरग्रॅज्युएट उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. विविध राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, मुंबई, दिल्ली, पाटना येथे ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४२५० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचआरए मिळणार आहे. सध्या ऑफिस अटेंडंट पदासाठी ४६,०२९ रुपये पगार मिळत आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.रिझर्व्ह बँकेतील ऑफिस अटेंडंट पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणा आहे. रीजनिंग, इंग्लीश, जनरल अवेअरनेस या विषयांची ऑनलाइन टेस्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हेही वाचा :

पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार

यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’

मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *