ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि नोकरीच्या शोधात असाल(opportunities)तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत ६०० पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही आजपासून अर्ज करु शकतात.अप्रेंटिसशिप ही एक प्रकारची ट्रेनिंग असते. तुम्हाला एखाद्या संस्थेत काम करण्याची संधी मिळते. तिथे संपूर्ण काम कशा प्रकारे चालतं याबाबत ट्रेनिंग दिले जाते. अप्रेंटिसशिप ही ६ महिने किंवा १ वर्षांची असते. यादरम्यान बँकेत प्रॅक्टिकली ट्रेनिंग मिळते. यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते.

बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची (opportunities)तारीख २५ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. मेरिट बेसिसवर तुमची निवड केली जाणार आहे.बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले असावे. याचसोबत त्यांना स्थानिक भाषा येत असायला हवी. याचसोबत १० वी आणि १२वीचे मार्कशीट असायला हवे. ज्यामध्ये तुमच्या स्थानिक भाषेत तुम्ही शिक्षण पूर्ण केलेले असावे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी bankofmaharashtra.bank.in या (opportunities)वेबसाइटवर जायचे आहे.
तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला सर्व फॉर्म भरायचा आहे. यानंतर फोटो आणि सही अपलोड करा.
यानंतर फॉर्म अपलोड करण्याआधी प्रिंट आउट काढून ठेवा.
हेही वाचा :
पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार
यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’
मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर