कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील लक्षवेधी आणि चुरशीच्या (service) मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ०७ ड मधील लढतीत आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय खेचून आणत आपला गड राखला आहे. माजी नगरसेवक विजय साळोखे यांच्याविरोधातील ही लढत विशेष चर्चेत होती.‘नो मेवा, ओन्ली सेवा’ अशी प्रचाराची टॅगलाईन करत विजय साळोखे यांनी विशेषतः सोशल मीडियावर जोरदार वातावरण निर्माण केले होते. इन्स्टाग्रामसह विविध डिजिटल माध्यमांवर साळोखे यांच्याबद्दल तयार झालेल्या क्रेझमुळे त्यांचाच विजय होईल, अशी चर्चा जिल्हाभर रंगली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात मतदारांनी वेगळाच कौल दिला. संघटित प्रचार, स्थानिक संपर्क आणि पारंपरिक मतदारांवर विश्वास ठेवत ऋतुराज क्षीरसागर यांनी निर्णायक विजय मिळवला.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील इतर प्रमुख लढतींचे निकालही स्पष्ट होत आहेत.(service) शिवसेनेच्या शीला सोनुले यांनी काँग्रेसचे रजनीकांत सरनाईक यांचा पराभव केला. काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे यांनी विजय मिळवला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांचा पराभव झाला आहे.भाजपच्या दीपा काटकर यांनी काँग्रेसच्या तनिष्का सावंत यांच्यावर मात केली, तर एका अन्य लढतीत काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव विजयी झाले असून शिवसेनेचे नंदकुमार मोरे पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले असून (service) महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेसने चारही जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. या प्रभागातून स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दिपाली घाडगे आणि राजेश लाटकर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.एकूणच कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सोशल मीडिया विरुद्ध पारंपरिक राजकारण, घराघरातील संपर्क आणि संघटनात्मक ताकद यांचा संघर्ष ठळकपणे दिसून आला असून, अनेक निकालांनी राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू