येथील महापालिकेच्या झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (election) आज शेवटपर्यंत उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात मतदारांना बाहेर काढण्याठी मोठी चुरस होती. महापालिका स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक होती.त्यामुळे उत्साहही होता. काही ठिकाणी प्रचंड ईर्ष्याही दिसून आली. तर अनेक ठिकाणी परस्पर विरोधी उमेदवारांच्या समर्थकांत किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. यावेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणाखाली आली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी होता. सायंकाळी मात्र अनेक केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती.

एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी ही निवडणूक झाली. २३० उमेदवारांचे भवितव्य (election) आज मतदान यंत्रणात बंद झाले आहे. शुक्रवारी ता. १६ सकाळी १० वाजता राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. त्याच्या निकालानंतर नवे कारभारी कोण? असणार हे स्पष्ट होणार आहे.शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली. पण, सायंकाळी अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उशिरापर्यंत अनेक केंद्रांत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.
सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काही केंद्रांवर मतदारांची रांग दिसत होती, तर अनेक केंद्रांवर अगदी तुरळक गर्दी दिसत होती. काही केंद्रांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांत वादावादी झाली. तांबेमाळ येथील शाळेसमोर जमलेल्या जमावाला पोलिसांनी पांगवले.सरस्वती हायस्कूल परिसरात शिव-शाहू आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. या ठिकाणी एका उमेदवाराच्या नावेवाइकाला जबर मारहाण केली. अशाच प्रकारचा प्रकार प्रभाग पाचमधील जवाहरनगर परिसरात घडला. शिवसेना ठाकरे गट व भाजप कार्यकर्त्यांत पैसे वाटण्याच्या आरोपावरून वाद झाला.
पोलिस अधीक्षकांची मतदान केंद्रांना भेट
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील बंदोबस्ताचा आढावा घेतला.
मतदार संख्या
पुरुष मतदार = १२५६७२
महिला मतदार = १२३१८०
इतर मतदार = ५५
एकूण मतदार = २४८९०७
क्षणचित्रे
९० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ मतदारांना सन्मानपत्र, दिव्यांग मतदारांनीही (election) मतदान केंद्रांवर येत लोकशाही प्रक्रियेत सहभाग, वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर, रिक्षा, व्हॅन, छोटे टेंपो आदी वाहनांचा वापर, प्रभागाबाहेर वास्तव्यास असलेले मतदारही शहरात, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अस्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा नव्हत्या, याचा मतदान केंद्रातील कर्मचा-यांना फटका
मतदारांचा गोंधळ
मतदारांना दिलेल्या स्लिपवर मतदान केंद्राचा व खोलीचा स्पष्ट उल्लेख नव्हता, तर काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या खोलीचे क्रमांक दिल्याने गोंधळ उडाला. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर येथे मतदान नसल्याबाबत सांगण्यात आल्यानंतर काही मतदार निराश होऊन घरी परतले.
१०० मीटर नियमाचा फज्जा
निवडणूक नियमांनुसार मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना थांबण्यास मनाई होती. पण, अनेक ठिकाणी हा नियम धाब्यावर बसवला. काही उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी थेट मतदान केंद्रांत जाताना दिसून आले. पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने १०० मीटर नियमाचा फज्जा उडाल्याची चर्चा होती.
मोबाईल ठेवण्यास कक्ष नसल्याने गोंधळ
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर अशा कक्षाची सोय केली नव्हती. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत होती. त्यामुळे मोबाईल कोठे ठेवायचा?, अशा संकटात मतदार होते. यावरून पोलिस व मतदार यांच्यात वादावादीचे प्रसंग झाले.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू