वस्त्रनगरीच्या राजकारणात नेहमीच दबदबा असलेल्या आवाडे घराण्यातील (family’s) चौथी पिढी आता राजकारणात पदार्पण करीत आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुधवारी ता. २१ त्या हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,(family’s) आमदार राहुल आवाडे या तीन पिढ्यांनंतर आता सानिका आवाडे या राजकीय क्षेत्रात सक्रीय होत आहेत. नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत सानिका आवाडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता त्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर आपले नशीब आजमावणार आहेत.
विशेष म्हणजे गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात सानिका यांचे (family’s)वडील व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषदेतून प्रतिनिधित्व केले होते. वडिलांप्रमाणेच सानिका यांनीही महापालिकेऐवजी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आवाडे परिवारातील चौथी पिढी आता राजकारणात प्रवेश करीत आहे.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद