इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना दिलासा देणारी बातमी (workers) समोर आली असून, २०१३ मध्ये झालेल्या संयुक्त करारानुसार २०२५ साठीची मजुरीवाढ जाहीर करण्यात आली आहे. या करारातील तरतुदीनुसार महागाई भत्त्यातील वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीस रेट पद्धतीनुसार ही वाढ प्रतिमीटर सहा पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.

२०१३ च्या करारानुसार दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ देणे बंधनकारक आहे.(workers) त्या आधारे सध्याची वाढ ०.०५५७ पैसे इतकी ठरत असली, तरी ती रक्कम पूर्णांकात रूपांतरित करून ५२ पिकास मीटरच्या हिशोबाने प्रतिमीटर सहा पैसे इतका महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे तसेच सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी संयुक्तपणे हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२६ पासून देण्याचे आवाहन केले आहे. या वाढीमुळे यंत्रमाग कामगारांच्या जीवनमानात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, २०१३ च्या करारानुसार २०१६ पर्यंत महागाई भत्त्यात वाढ देण्यात आली होती. (workers) मात्र २०१७ पासून प्रत्यक्षात ही वाढ कामगारांना मिळालेली नाही. मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही वाढ २०२६ मध्ये तरी लागू होणार का, याकडे कामगारांसह संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. शहरातील औद्योगिक शांतता टिकवण्यासाठी मालक व कामगार संघटना या निर्णयाची अंमलबजावणी करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद