इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा (power) मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण लागल्याने वस्त्रनगरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या ऐतिहासिक संधीमुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. अनुभवी नगरसेवकांमध्ये विठ्ठल चोपडे, तानाजी पोवार आणि राजू बोंद्रे ही नावे आघाडीवर असून, त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा कोणाला मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

त्याचवेळी नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(power) उदय धातुंडे, नीतेश पोवार, प्रदीप धुत्रे आणि राजू पुजारी यांच्यापैकी एखाद्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापालिकेत ६५ पैकी ४७ जागांवर महायुतीने विजय मिळवला असून, त्यापैकी तब्बल ४३ जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे पहिला महापौर भाजपचाच होणार हे निश्चित मानले जात आहे.
आरक्षण सोडत जाहीर होताच संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली असून,(power) पक्षांतर्गत समीकरणे, वरिष्ठ नेत्यांची पसंती आणि अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाचा समतोल या मुद्द्यांवर अंतिम निर्णय अवलंबून राहणार आहे. त्यामुळे इचलकरंजीला पहिला ओबीसी महापौर कोण मिळणार, याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हेही वाचा :
निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: हातकणंगलेत समर्थकांचा ‘महापूर’, कोल्हापूर-सांगली रस्ता ठप्प!
थेट अमेरिकेत घुसून डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या? इराणच्या डोक्यात नेमका प्लॅन काय
धनश्रीसोबत घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलला वैयक्तिक आयुष्यात आणखी एक मोठा धक्का