कोल्हापूरची गादी आणि तिथलं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळणं घेत असतं..(happening)महापालिका निवडणुकीत महायुतीने कोल्हापूरात 45 जागांसह बहुमताचा आकडा गाठला असला, तरी सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अधिक गडद झालाय. आणि याला कारण ठरलयं. काँग्रेस – शिंदेसेनेच्या युतीवर सतेज पाटील यांनी केलेलं सूचक विधान.एकीकडे महापौर पदासाठी कोल्हापुरात शिंदेसेना आणि भाजपात दावे प्रतिदावे सुरु असताना दुसरीकडे सतेज पाटलांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.

त्यामुळे कोल्हापुराच्या राजकीय आखाड्यात सत्तेसाठी कशी (happening) गोळीबेरीज होऊ शकते पाहूयात. कोल्हापूरात भाजपला 26, शिंदेसेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 अशा महायुतीला एकूण 45 जागा मिळाल्यात. तर दुसरीकडे काँग्रेसला 34 तर ठाकरेसेनेला 1 अशा 35 जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात. मात्र काँग्रेसचे 34 आणि शिंदेंचे 15 नगरसेवक एकत्र आल्यास कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेनेला सत्ता स्थापन करणे शक्य आहे.
राज्यात मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून आधीच भाजप (happening)आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजपनं शिंदेसेनेला सत्तेत डावलल्यास राज्यात वेगवेगळ्या महापालिकांमध्ये शिंदेंसमोर भाजपची कोंडी करण्यासाठी इतर पक्षांसोबतच्या हातमिळवणीचा पर्याय आहे. मात्र शिंदे कोल्हापुरात खरचं काँग्रेससोबत युती करणार का? शिंदेंसेनेची नाराजी भाजप कशी दूर करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?