इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर आणि उपमहापौर (curiosity) निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आज महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यामुळे येत्या ३० किंवा ३१ जानेवारी रोजी पहिल्या महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वस्त्रनगरीच्या पहिल्या महापौरपदासह उपमहापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.मुंबईत झालेल्या महापौर आरक्षण सोडतीनुसार इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांच्या समर्थकांकडून समाजमाध्यमांवर आपलाच नेता पहिला महापौर होणार असल्याचे दावे केले जात आहेत. यामुळे या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अनुभवी दावेदारांमध्ये तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे आणि राजू बोंद्रे यांची (curiosity)नावे आघाडीवर असली तरी, पहिल्या महापौरपदावर नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. त्यामुळे उदय धातुंडे यांचे नावही राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. तसेच पहिल्या महापौरपदावर महिलेला संधी देऊन सन्मान करण्यात येणार का, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण ठरणार, याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.पहिला महापौर भाजपचा असणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असले तरी, उपमहापौरपद घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला शिंदे गट दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमहापौरपद भाजपकडे राहिल्यास महिला व बालकल्याण समिती शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्थायी समितीवर आवाडे गटाचे वर्चस्व राहणार की हाळवणकर गट बाजी मारणार, याबाबतही जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी यासाठी फिल्डिंग लावली आहे.

दरम्यान, महापालिका झाल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांसाठी दालनांचे काम(curiosity) तिसऱ्या मजल्यावर युद्धपातळीवर सुरू आहे. पदाधिकारी निवडीपूर्वी सर्व दालने सुसज्ज करण्यावर प्रशासनाचा भर असून, पहिली सभा नव्या सभागृहात घेण्याचा मानसही प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने सभागृहाच्या कामालाही गती देण्यात आली आहे.सत्तारुढ भाजप महायुतीकडून येत्या काही दिवसांत विविध पदांवरील निवडी पूर्ण केल्या जाणार असून, त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची निवड होणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विरोधी शिवशाहू विकास आघाडीकडून या पदासाठी दोन ते तीन नावांची चर्चा सध्या सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल

 रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *