महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.(Rain) कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा उन्हाचा तडाखा जाणवतोय. त्यामुळे नागरिक गोंधळात पडले आहेत. अशाच वातावरणात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून, त्यामुळे वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत राज्यातील काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. या पावसामुळे थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी धुक्याचाही अनुभव येऊ शकतो. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान बदल अधिक जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे ,जळगावसह अनेक भागांत दिवसभर (Rain) ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलका पाऊस पडू शकतो. सकाळच्या वेळेत गारवा जाणवेल, मात्र दुपारी तापमान वाढून उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे थंडी आणि उष्णतेचा हा दुहेरी अनुभव नागरिकांना जाणवू शकतो.विदर्भात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र सकाळी सौम्य थंडी आणि गार वारे जाणवण्याची शक्यता आहे. नागपूरसह काही भागांत सकाळी हलकं धुके दिसू शकतं. दुपारनंतर मात्र तापमानात वाढ होऊन उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ढगाळ आकाश राहण्याची शक्यता हवामान (Rain) विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर सकाळच्या वेळेत धुक्याचीही शक्यता असून, यामुळे वाहनचालकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. तापमानात अचानक बदल झाल्याने सर्दी-खोकल्यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळी धुके दिसू शकतं, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार दिसू शकतात. (Rain) कोकण भागात मात्र हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असून, पावसाचा मोठा प्रभाव जाणवणार नाही, असा अंदाज आहे.जानेवारी संपत असताना राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी होताना दिसत आहे. मात्र अवकाळी पाऊस झाल्यास वातावरणात पुन्हा मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बदलत्या हवामानामुळे रोजच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक ठरणार आहे.
हेही वाचा :
आरसीबी आयपीएल टीम अदर पुनावाला खरेदी करणार?
या महिलेवर जीव ओवाळून टाकतात पुतिन, देते थेट आदेश
QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर