देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.(income) या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विवाहित करदात्यांनादेखील खुशखबर मिळू शकते.विवाहित जोडप्यांना आता एकत्र इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची संधी मिळू शकते.सध्या करदात्यांना प्रत्येकाला वेगवेगळा टॅक्स रिटर्न फाइल करावा लागत आहे. पती आणि पत्नीलादेखील स्वतंत्र टॅक्स रिटर्न फाइल करावा लागत आहे. दरम्यान, आता अर्थसंकल्पापूर्वी ICAI ने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, विवाहित जोडप्यांना आता जॉइंट टॅक्स रिटर्न फाइल करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. यामळे अनेक कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वेगवेगळा टॅक्स रिटर्न फाइल केला जातो. त्यामळे जास्त कर भरावा लागतो. यामुळे फायदा होणार आहे.

सध्याच्या नियमानुसार घरचा खर्च आणि गुंतवणूक जरी एकत्रित असली (income) तरी त्याचे हिशोब वेगवेगळे लागता. आता जर हा नवीन नियम लागू केला तर विवाहित जोडप्यांना दोन पर्याय मिळणार आहेत. सध्या त्यांना स्वतंत्र टॅक्स भरावा लागत आहे. नवीन पर्यायानुसार, पती-पत्नीची कमाई एकत्र करुन जॉइंट टॅक्स रिटर्न भरावा लागणार आहे.यासाठी दोघांकडे स्वतंत्र पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. –जॉइंट टॅक्स सिस्टीममध्ये बेसिक एक्झम्पशन लिमिट म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा सूट दुप्पट केली जाऊ शकते.
८ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्स असू शकते. ४८ लाखांपेक्षा जास्त (income) उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स लागू केला जाऊ शकतो.यामुळे फायदा होणार आहे.जर कुटुंबात पती किंवा पत्नी नोकरी करत असतील. तर दुसऱ्या व्यक्तीची टॅक्स सवलत वाया जाते. जॉइंट टॅक्समध्ये या सवलतीचा वापर होणार आहे.जर एखाद्या जोडीदाराचे उत्पन्न कमी असेल आणि दुसऱ्याचे खूप जास्त तर तुम्ही कमी टॅक्स स्लॅबमध्ये रिटर्न फाइल करु शकतात.होम लोन, हेल्थ इन्श्युरन्स आणि कलम 80C अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा होऊ शकतो.
हेही वाचा :
राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
खूशखबर! लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?