सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे.पेमेंट करणेदेखील आता ऑनलाइन होतं.(feature)भाजी घेण्यापासून ते काहीही घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. काही क्लिकवर तुम्ही पेमेंट करु शकतात. दरम्यान, आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयसाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. UPI Now Pay Later असं या फीचरचं नाव आहे.यूपीआयचं हे नवीन फीचर खूप उपयोगी आहे. या फीचरला यूपीआयद्वारे प्री अप्रुव्हड क्रेडिट लाइन असंही म्हणतात. यामुळे आता तुमच्या खात्यात जर पैसे नसतील तर गरज पडल्यास बँकेकडून मंजूर केलेल्या क्रेडिट कार्डचा वापर करुन पेमेंट करु शकतात. त्यामुळे जर खात्यात पैसे नसतील तरी काही टेन्शन नाही.

UPI Now Pay Later ही एक क्रेडिट सुविधा आहे. यामध्ये बँक ग्राहकांना प्री (feature)अप्रुव्हड क्रेडिट लिमिट देतात. याचा वापर करुन तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करु शकतात. यानंतर काही ठरावीक काळात ही रक्कम परतदेखील करु शकतात. ही सुविधा शॉर्ट टर्म क्रेडिटसारखं काम करते. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर उपयोगी ठरते.
आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अॅपने लाँच केलं नवं फीचर
तुमची बँक तुम्हाला तुमच्या प्रोफाइल किंवा क्रेडिट स्कोअरनुसार क्रेडिट कर्जाची (feature)मर्यादा ठरवते. यामध्ये पेमेंट करताना युजर्स बँक खात्याऐवजी क्रेडिट लाइनचा पर्याय निवडू शकतात. ही रक्कम तुमच्या क्रेडिट मर्यादेतून वजा केली जाते. यानंतर अटीनुसार तुम्हाला बिल भरावे लागते.
हेही वाचा :
राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
खूशखबर! लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?