जानेवारी महिना संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या आहेत.(holidays) फेब्रुवारी महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर आताच यादी चेक करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्याच्या अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शनिवार-रविवार आणि काही सणासुदीच्या सुट्ट्या असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात काही दिवस देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. प्रत्येक राज्याच्या सणांनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहेत. त्यामळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून जा. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
१ फेब्रुवारी रविवारी- रविवारी देशातील (holidays)सर्व बँका बंद राहणार आहेत.
१४ फेब्रुवारीला दुसऱ्या शनिवारी देशातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारीला रविवारमुळे बँक बंद असणार आबे.
२२ फेब्रुवारीला रविवारमुळे देशातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
२८ फेब्रुवारी चौथ्या शनिवारी देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळेदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त आंध्र प्रदेश, (holidays)बिहार,महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.
१८ फेब्रुवारी रोजी सिक्कीममध्ये लोसारनिमित्त सुट्टी असणार आहे.
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
२० फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये राज्य स्थापना दिवसनिमित्त बँका बंद असणार आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली