रेल्वेने प्रवास करताना दारू बाळगण्याबाबत अनेक प्रवाशांच्या मनात संभ्रम असतो.(Railways) ट्रेनमध्ये दारू नेणे किंवा पिणे गुन्हा ठरतो का, याबाबत स्पष्ट नियम आहेत. भारतीय रेल्वे कायदा १९८९ मध्ये दारूवर थेट बंदी नसली तरी हे नियम संबंधित राज्यांच्या उत्पादन शुल्क कायद्यांवर अवलंबून आहेत.

रेल्वेत दारू पिणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर मद्यपान केल्यास थेट कारवाई केली जाऊ शकते.(Railways) मात्र, काही अटींच्या अधीन राहून प्रवाशांना मर्यादित प्रमाणात सीलबंद दारूच्या बाटल्या नेण्याची परवानगी आहे. ही परवानगी फक्त वैयक्तिक वापरासाठी असून एका प्रवाशाला जास्तीत जास्त दोन लिटरपर्यंतच दारू नेण्याची मुभा आहे. दारूच्या बाटल्या पूर्णपणे सीलबंद असणे बंधनकारक असून रिकाम्या बाटल्या नेण्यासही मनाई आहे.
हे नियम मात्र सर्व राज्यांमध्ये समान लागू होत नाहीत.(Railways) गुजरात, बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये दारूबंदी लागू आहे. या राज्यांमधून जाणाऱ्या ट्रेनमध्ये किंवा त्या राज्यांच्या हद्दीत दारूसह आढळल्यास संबंधित राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत अटक, मोठा दंड आणि तुरुंगवासाचीही शिक्षा होण्याची शक्यता असते.रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना दारू बाळगण्यापूर्वी मार्गातील राज्यांचे कायदे आणि रेल्वेचे नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियम पाळल्यासच प्रवास सुरक्षित आणि अडचणमुक्त होऊ शकतो.
हेही वाचा :
राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
खूशखबर! लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?