देशभरात काल स्वातंत्र्य दिवस (Independence Day)उत्साहाने साजरा करण्यात आला. जनसामान्यांप्रमाणे अनेक खेलाडू, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालेला हा दिवस उत्साहात साजरा करत त्याचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले आणि सर्व चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती, राज कुंद्रा आणि तिच्या घरच्यांनीही स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा तर दिल्याच पण त्यांनी घरी ध्वजारोहणही केलं.

त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राज कुंद्रा, तसेच त्याची दोन लहान मुलं आणि शिल्पाची बहीण शमिता शेट्टीही दिसले. राष्ट्रगीत सुरू असताना सर्वच जण सावधान उभे राहून ध्वजाला (Independence Day)मानवंदना देत होते. पण त्यावेळी शमिता शेट्टीची कृती, तिचं वर्तन पाहून लोकांचं डोकंच फिरलं. राष्ट्रगीत सुरू असताना ती नीट उभी नव्हती, सतत हलत होती. सावधना उभं रहायचं सोडून सारख हलत, इकडे तिकडे बघत, कधी एक हात डोळ्यावर ठेऊन ती अतिशय कॅज्युअल पोझिशनमध्ये होती.

मात्र तिचा हा कॅज्युअल अविर्भाव लोकांना काही आवडला नाही. ते पाहून अनेका नेटीझन्सचा संताप झाला आणि त्यांनी तिला चांगलंच खडसावलं. राष्ट्रगीत सुरू असताना कसं उभं रहायचं असतं ? शमिताला प्रोटोकॉल माहीत नाहीत का? अशी कमेंट एकाने केली. तर त्या लहान मुलीला( शिल्पाची लेक) मोठ्यांपेक्ष जास्त मॅनर्स आहेत, असं आणखी एकाने लिहीलं. शमिता हे राष्ट्रगीत आहे, शरारा साँग नव्हे असं म्हणत आणखी एका युजरने तिला चिमटा काढला. असं (कॅज्युअल) उभं राहून शमिता ही राष्ट्रगीताचा अपमान करत्ये असं लिहीत आणखी एका यूजरने संताप व्यक्त केला.

कूल बनण्याच्या नादात, राष्ट्रगीतावेळी कसं उभं रहायचं हे या लोकांना माहीत नाही, अशी कमेंट आणखी एका युजरने केली. एकंदरच सर्वांनी शमितावर चांगलेच तोंडसुख घेतलं.शमिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3 मध्ये काही काळापूर्वी तिची बहीण शिल्पा शेट्टीसोबत झळकली होती. त्यामध्ये हुमा कुरेशी, सकीब सलीमही दिसले होते.

हेही वाचा :

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत!

आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक

पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *