राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. पुण्यातही गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना घडत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू(alcohol) पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक केली आहे. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी कृष्णा कांबळे याला दारु(alcohol) पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदे करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करुन आईला त्रास देत होता. पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आाई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. छातीत चाकूने भोसकला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत.

लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेबने 7 ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून आईचा खून केला.

त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलगा काका साहेबचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधवचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा :

धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट….

सुप्रियाला पाहून सचिनच्या आईचे मन जिंकले; केली अनपेक्षित मागणी

राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *