उत्तर प्रदेशमध्ये सतत विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे चर्चेत असतात. कधी प्रियकरासाठी बायको(Wife) पळून जाते तर कधी नवरा प्रेयसीसाठी पत्नीची हत्या करतो. उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मध्यरात्री अशीच एक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांची झोप उडाली. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर संतापलेल्या नवऱ्याने आणि त्याच्या भावांनी मिळून जे काही पाऊल उचलले ते पाहून पोलिसही हादरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ माजली आहे. ही घटना सिंघवाली अहीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलौचपुरा गावातील आहे. येथे एका तरुणाचे शेजारील विवाहित महिलेशी(Wife) बराच काळ अनैतिक संबंध होते. असे सांगितले जाते की, पतीच्या अनुपस्थितीत हे दोघे अनेकदा लपूनछपून भेटत असत.

शनिवारी रात्रीही महिलेचे कुटुंब घराच्या छतावर झोपलेले असताना प्रियकर चोरट्या पावलांनी तिच्या खोलीत शिरला. थोड्या वेळाने खोलीतून आवाज आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांना वाटले की घरात चोर शिरला आहे. संशयाच्या आधारावर कुटुंबीय खाली उतरले आणि शोधाशोध सुरू केली. जेव्हा महिलेच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

खोलीत प्रियकर आणि महिला अर्धनग्न अवस्थेत होते. हे दृश्य पाहताच पती आणि दीर संतापले. त्यांनी दरवाजा बंद करून दोघांनाही जोरदार मारहाण केली. नवऱ्याने त्याच्या भावांसोबत मिळून दोघांनाही काठीने जोरदार मारहाण केली. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रियकराची इतकी मारहाण झाली की त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येऊ लागले. व्हिडिओमध्ये महिला(Wife) आणि तिचा प्रियकर जीव वाचवण्याची विनवणी करताना दिसत आहेत. महिला आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी भीक मागत होती, पण संतापलेले कुटुंबीय सतत मारहाण करत राहिले. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मारहाणीनंतर जखमी तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला चोर म्हणून खटला दाखल केला आहे.

हेही वाचा :

धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट….

सुप्रियाला पाहून सचिनच्या आईचे मन जिंकले; केली अनपेक्षित मागणी

राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *