रशियामध्ये एक मोठा सोशल मीडिया स्ट्राइक झाला आहे. (strike) पुतिन सरकाने सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय घेतला. रशियामध्ये व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसह अनेक परदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. जवळजवळ १० कोटींपेक्षा जास्त युजर्सला ब्लॉक करण्यात आले आहे. या वेबसाइट्सचे डोमेन नेम रशियाच्या राष्ट्रीय डोमेन नेम सिस्टममधून काढून टाण्यात आले आहे.रशियातील नागरिकांना स्थानिक सोशल नेटवर्किंग साइट्स उपलब्ध करून देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय सार्वजनिक गोपनीयता राखण्यासाठी आणि गैरवापर होऊ शकणाऱ्या वैयक्तिक डेटा लीक होऊ नये यासाठी घेण्यात आला आहे.

रशियामध्ये फक्त सोशल मीडियाच नाही तर अनेक(strike)आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांच्या वेबसाईट्सवरही परिणाम झाला आहे. बीबीसी, ड्यूश वेले, रेडिओ फ्री युरोप, रेडिओ लिबर्टी आणि अनामिक टॉर ब्राउझर देखील ब्लॉक केले आहेत. सरकारने सर्व इंटरनेट प्रदात्यांना राष्ट्रीय डोमेन नेम सिस्टम वापरण्याचे आदेश दिले आहेत. जे देशाच्या सार्वभौम इंटरनेट कायद्यानुसार आवश्यक आहे.२०२१ पासून रशियामध्ये गुगल डीएनएससह इतर डीएनएस सिस्टमच्या वापरावर बंदी घातली. या सर्व डीएनएस सेवांचा वापर करण्यावर हळूहळू प्रतिबंधन करण्यास रशियाने सुरूवात केली होती.

आता रशियाने मोठं पाऊल उचलत थेट इंटरनेट नियंत्रणाच्या दिशेने मोठे (strike)आणि कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली.रशियाच्या पुतिन सरकारने सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर डेन्मार्क, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. स्पॅनिश सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणाही केली आहे. भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी वाढत आहे. यामागचे कारण म्हणजे लहान मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा :

पंचायत समितीच्या निवडणुकीत ड्रग्जचा वापर? कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

महाराष्ट्र पुन्हा हादरला! सहावीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

विद्यार्थ्यांनो वर्षातील १६ सुट्ट्या रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *