सध्या टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळवले जात आहेत.(drink) भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येत आहेत. यावेळी दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावरही काही सामने खेळवले गेले. यामध्येच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लोकांना दिलेले कोल्ड्रिंकचे ग्लास गोळा केले जातात. यावेळी त्यामध्ये शिल्लक असलेलं कोल्ड्रिंक पुन्हा मोठ्या बाटल्यांमध्ये पुन्हा भरताना या व्हिडीओमध्ये दिसतंय. हे कोल्ड्रिंक पुन्हा पुढील सामन्यासाठी वापरलं जातं, असाही दावा करण्यात आला आहे

व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती असं म्हणतेय की, “हे बघा… जे (drink) काही उरलंय ते बाटलीत पुन्हा भरण्यात येतंय. हेच कोल्ड्रिंक पुढील सामन्यासाठी वापरलं जाईल… तुम्हाला हा स्कॅम दिसतोय का?”या व्हिडिओमुळे आता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. बाटल्या खरोखरच पुन्हा वापरल्या जातात का किंवा एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातंय का, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. जर हे खरं असेल तर केवळ निष्काळजीपणाच नाही तर प्रेक्षकांसाठी हा गंभीर आरोग्य धोका मानला जाणार आहे.

स्टेडियम व्यवस्थापन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या याप्रकरणाची (drink) सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, व्हिडीओची सत्यता पडताळून पुढची कारवाई करण्यात येणार आहे.अनेकांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर टीका केली आहे. यामध्ये काहींनी हा आरोग्याशी खेळ असल्याचं म्हटलंय. तर काहींना यावर मजेशीरही कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हटलंय की, तो ही बाटली घरी घेऊन जाईल, तर काहींनी म्हटलंय की, हा असाच बिझनेस चालतो.

हेही वाचा :

पंचायत समितीच्या निवडणुकीत ड्रग्जचा वापर? कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

महाराष्ट्र पुन्हा हादरला! सहावीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

विद्यार्थ्यांनो वर्षातील १६ सुट्ट्या रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *