सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.(suddenly) यामध्ये दोन महिलांची तुफान हाणामारी पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगं जवळच्या सिव्हिल लाईन रोडवरील सिटीकार्ट शॉपिंग मॉलमध्ये हा प्रकार घडला. शनिवारी संध्याकाळी ३ वाजण्याच्या सुमारास हा गोंधळ उडाला होता.तिथल्या काही लोकांच्या सांगण्यानुसार, एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करण्यासाटी आला होता.

त्याचवेळेस त्याची पत्नी देखील तिथे आली. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला (suddenly)आणि नंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.पत्नीने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिला प्रचंड राग आला. अशावेळी तिचा संयम सुटला आणि दोन्ही महिलांमध्ये हाणामारी झाली. मुख्य म्हणजे हा गोंधळ ज्यावेळी झाला तेव्हा तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. तर दोन्ही महिला बराच वेळ भांडत राहिल्या.
ज्यावेळी हे भांडण झालं तेव्हा मॉलमधील लोकांनी हे भांडण (suddenly)पाहिलं तर काहींनी त्यांच्या फोनवर शूट केलं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांशी भांडताना आणि केस ओढताना दिसतायत. एका महिलेच्या हातावर जखमा दिसून येतायत.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच समजताच मॉल कर्मचारी आणि ग्राहकांनी दोन्ही महिलांना बाजूला केलं. मॉलच्या मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनाही मॉलच्या बाहेर काढण्यात आलं.
हेही वाचा :
T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…