अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे.(plane) मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून तपास यंत्रणा सध्या सखोल चौकशी करत आहेत.मुंबईवरून बारामतीकडे प्रचारसभांसाठी रवाना झालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीलगत कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानातील एकाही व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही. घटनास्थळावरील काही धक्कादायक व्हिडिओही समोर आले. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी जाहीर झाली. या घटनेने राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला.

त्यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र दिसले.(plane) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत पक्षाची जबाबदारी स्वीकारली. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा कोणत्याही विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली नव्हती. जर असा निर्णय असता, तर त्यांनी तो विषय आधीच आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडला असता, असेही त्यांनी नमूद केले.

अपघातानंतर विविध मंत्री, आमदार आणि खासदारांकडून या दुर्घटनेबाबत शंका व्यक्त होत आहेत.(plane) तपास यंत्रणांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून फ्लाइट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरीत्या डाउनलोड केल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला तीव्र उष्णतेमुळे रेकॉर्डरचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते; मात्र नव्या माहितीनुसार त्यातील डेटा सुरक्षितपणे मिळवण्यात आला आहे. या डेटातून महत्त्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत सातत्याने संशय व्यक्त करत नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले की, अजित पवार यांच्या विमानासाठी पूर्वी नियुक्त असलेले पायलट यश आणि साहिल मदन सध्या कुठे आहेत? 28 जानेवारी 2026 रोजी हे दोघेच त्या विमानाचे पायलट होते, मात्र अचानक त्यांची बदली का करण्यात आली, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या नव्या प्रश्नांमुळे अपघाताच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत मित्रांकडून मित्राची निर्घृण हत्या; वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून टोकाचा निर्णय

मधुचंद्राच्या रात्री रोमान्स करत होतं नवविवाहित जोडपं, चुकून व्हिडिओ झाला लाइव्ह, सोशल मीडियावर व्हायरल

सावधान! १ एप्रिलपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार; तुमच्यावर काय परिणाम?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *