सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.(recruitment) राज्य शासनाने प्रशासनात मनुष्यबळ वाढवण्यासाठी तब्बल 70 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही घोषणा केली असून, येत्या काळात हजारो उमेदवारांना शासकीय सेवेत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

या भरतीपैकी सुमारे 20 हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत,(recruitment) तर उर्वरित पदे विविध शासकीय विभाग आणि स्वायत्त संस्थांमधून भरली जातील. सेवा प्रवेश नियमावलीत आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असून, आधुनिक प्रशासनाच्या गरजेनुसार कौशल्याधारित भरतीवर भर दिला जाणार आहे.

भरती प्रक्रियेत विलंब, गैरव्यवहार आणि कागदपत्रांच्या झंझटीपासून (recruitment)मुक्ती मिळावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमाणपत्र पडताळणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिलॉकर प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याने उमेदवारांसाठी प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि विश्वासार्ह ठरणार आहे.भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणा पारदर्शक ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्र शासनाचं मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल राष्ट्रीय स्तरावर प्रशंसनीय ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *