भारतात अनेक लहान मोठ्या शहरांची नावे बदलण्याचे प्रस्ताव मांडले जात आहेत.(Cabinet) अशातच आता नामांतराचे लोण दक्षिण भारतात पोहचले आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्याचे नाव बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज ‘केरळ’ या राज्याच्या नावात बदल करून ते ‘केरलम ’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ आल्टेरेशन ऑफ नेम बिल , 2026’ हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेचे मत जाणून घेण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवतील.

राज्य विधानसभेकडून मत प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार पुढील कार्यवाही करेल (Cabinet)आणि राष्ट्रपतींची शिफारस घेऊन ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’ असे बदलण्यासाठी ‘केरळ आल्टेरेशन ऑफ नेम बिल , 2026’ हे विधेयक संसदेत सादर केले जाईल. दरम्यान, केरळ अधिवेशन ने 24 जून 2024 रोजी ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’ असे करण्याचा ठराव मंजूर केला होता.
केरळ अधिवेशन ने 24 जून 2024 रोजी ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’(Cabinet) असे करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावात म्हटले आहे की आपल्या राज्याचे नाव मल्यालम भाषेत ‘केरलम’ असे आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. ‘केरळ पीरवी डे’ देखील 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपासूनच मल्याळम भाषिकांसाठी ‘युनाइटेड केरळ’ राज्याची मागणी होती. मात्र भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्याचे नाव ‘केरळ ’ असे नोंदवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य विधानसभेने केंद्र सरकारला संविधानाच्या कलम 3 अंतर्गत तातडीने पावले उचलून राज्याचे नाव ‘केरलम ’ असे करण्याची एकमताने विनंती केली होती.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या